काकोडा गावात महायुतीचे उमेदवार आ. चंद्रकांत पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद ..

काकोडा गावात महायुतीचे उमेदवार आ. चंद्रकांत पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद ..

काकोडा: महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. चंद्रकांत पाटील यांनी प्रचार दौऱ्याअंतर्गत काकोडा गावाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. विविध गावांना भेट देत असताना मिळणारा नागरिकांचा उदंड प्रतिसाद त्यांच्या कार्याची प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले. गावागावातून मिळणाऱ्या सन्मानाबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
आ. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यकाळात कृषी, शेती, शिक्षण तसेच पाणीपुरवठा, रस्ते, आणि शेती रस्ते आदी विकास कामांद्वारे आपल्या लोकप्रतिनिधित्वाचा ठसा उमटवला आहे. या कामांमुळे ग्रामस्थांनी प्रचारादरम्यान त्यांना जोरदार प्रतिसाद दिला आहे.
याप्रसंगी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पार्टी आदी महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यांनी आ. पाटील यांना पुढील काळात मोठ्या मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.