शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेकडून ‘श्री एकनाथ अध्यात्मिक सेवा वर्ष’ चे भव्य आयोजन- अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री अक्षयमहाराज भोसले यांची माहिती..

शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेकडून ‘श्री एकनाथ अध्यात्मिक सेवा वर्ष’ चे भव्य आयोजन..

अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री अक्षयमहाराज भोसले यांची माहिती..
शिवसेनेचे प्रमुख नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेकडून २०२५ हे संपूर्ण वर्ष ‘श्री एकनाथ अध्यात्मिक सेवा वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेतील मंत्री व लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री अक्षयमहाराज भोसले यांच्या नेतृत्वात राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये विविध आध्यात्मिक आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन होणार आहे.
राज्यात विविध उपक्रमांचे भव्य आयोजन
श्री एकनाथ अध्यात्मिक सेवा वर्षाच्या निमित्ताने शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेकडून संपूर्ण राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यामध्ये प्रामुख्याने खालील उपक्रमांचा समावेश आहे –
६०,००० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी ई-प्रणालीद्वारे अध्यात्मिक व पारंपरिक शिक्षण
– या अभियानात १००० कीर्तनकारांचा समावेश असेल, जे अध्यात्मिक शिक्षण प्रसारासाठी कार्यरत राहतील.
राज्यभरात भजन स्पर्धांचे आयोजन
– तालुका, जिल्हा आणि विभागनिहाय ‘श्री एकनाथ भजन स्पर्धा’ होणार, ज्यामुळे आध्यात्मिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचेल.
शिवसेना अध्यात्मिक सेनेत १ लाख नवीन सभासदांचा समावेश
– अध्यात्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेणाऱ्या शिवसैनिकांना संघटित करून मोठा जनसंपर्क अभियान राबवले जाईल.
‘श्री एकनाथ अध्यात्मिक संवाद’ महाराष्ट्र दौरा
– राज्यभर विविध ठिकाणी धार्मिक प्रवचन, संवाद आणि आध्यात्मिक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येईल.
धर्मवीर मुखपत्राची निर्मिती
– शिवसेना अध्यात्मिक सेनेचे अधिकृत मुखपत्र सुरू करण्यात येणार आहे, ज्यातून अध्यात्म, सामाजिक आणि सेवाभावी कार्यावर प्रकाश टाकला जाईल.
ग्रामीण भागात संत साहित्य भेट आणि भजन मंडळांना सहकार्य
– गरजू मंडळांना आवश्यक साहित्य व प्रशिक्षण देऊन त्यांना अधिक सक्षम केले जाईल.
६००० मंदिरांमध्ये शासकीय योजना आणि एकनाथ शिंदे यांच्या आध्यात्मिक कार्याचा प्रचार
– दरमहा कीर्तनाच्या माध्यमातून मंदिरांमध्ये सरकारी योजनांची माहिती पोहोचवली जाईल.
विभागीय अध्यात्मिक अधिवेशने
– राज्यभर धार्मिक आणि सांस्कृतिक अधिवेशनांचे आयोजन करण्यात येईल, ज्यामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार, भजन मंडळे आणि आध्यात्मिक अभ्यासक सहभागी होतील.
भव्य श्रीराम कथा महोत्सव
– रामायण व श्रीराम चरित्रावर आधारित भव्य कथांचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येईल.
अध्यात्मिक समस्या निवारणासाठी हेल्पलाइन सेवा सुरू
– नागरिकांच्या अध्यात्मिक अडचणी सोडवण्यासाठी विशेष हेल्पलाइन सुरू केली जाईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आध्यात्मिक क्षेत्रात भव्य कार्य
महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विकासासोबतच आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रालाही मोठा प्रोत्साहन मिळत आहे. त्यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त हा अनोखा उपक्रम राबवून शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना सामाजिक ऐक्य, संस्कृतीचा जतन आणि धार्मिक परंपरेचा प्रसार यासाठी कटिबद्ध आहे.
हे संपूर्ण वर्ष ‘श्री एकनाथ अध्यात्मिक सेवा वर्ष’ म्हणून साजरे करताना, समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत अध्यात्माची गोडी आणि संस्कार पोहोचवण्याचा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आध्यात्मिक उपक्रम ठरणार आहे.