हकीम आर. चौधरी यांना समाजसेवेबद्दल मौलाना अब्दुल कलाम आझाद पुरस्कार प्रदान..

हकीम आर. चौधरी यांना समाजसेवेबद्दल मौलाना अब्दुल कलाम आझाद पुरस्कार प्रदान

पुरस्कार मिळाल्याबद्दल.. दिनेश कदम यांच्याकडून हकीम चौधरी यांचा सत्कार..
जळगाव शहरात साप्ताहिक जळगाव दर्पण च्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. अब्दुल करीम सालार यांनी भूषविले. कार्यक्रमाची प्रस्तावना जहांगीर खान यांनी सादर केली.
या सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील लोकप्रिय आमदार श्री. राजुमामा भोळे यांना खानदेश रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रोटरी क्लबचे अध्यक्ष गनी मेमन साहेब यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी एकरा एज्युकेशनचे अध्यक्ष अल्हाज अब्दुल करीम सालार साहेब, रोटरी क्लबचे गनी मेमन साहेब, जळगाव दर्पणचे कार्यकारी संपादक जहांगीर ए. खान, राम रहीम रिअल इस्टेटचे संचालक हकीम आर. चौधरी, नवनाथ दारकुंडे माजी नगरसेवक, मा. नगरसेवक राजू भाऊ मराठे, दिनेश जी कदम, अध्यक्ष मराठा सेवा संघ, अॅडव्होकेट सलीम शेख, अकबर काकर यांसारख्या अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आमदार राजुमामा भोळे यांचा गौरव केला.
कार्यक्रमात डॉ. अब्दुल करीम सालार साहेब यांना शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सर सय्यद अहमद खान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच हकीम आर. चौधरी यांना समाजसेवेबद्दल मौलाना अब्दुल कलाम आझाद पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमात गरीब, विधवा, अपंगांसाठी अन्नधान्य वितरण करण्यात आले. यावेळी साप्ताहिक जळगाव दर्पण च्या ६ व्या वर्धापन दिनाचे विशेष प्रकाशन आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्ताईनगर येथील तौकिर शेख यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिपकभाऊ सूर्यवंशी, संजय शिंदे, सैयद नासीर, उमेश देशपांडे, सैयद आसिफ अली, आयेशबी मणियार, दिलीप नाझरकर, अलिमोड्डीन शेख, विनायक पाटील, फिरोझ खान, विजय राठोड, इमरान शेख, सोहेल देशमुख, अजिज जनाब, आसिफ शेख यांच्यासह अनेक मान्यवरांनी योगदान दिले.
कार्यक्रमाचा समारोप जहांगीर खान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या मान्यवरांनी साप्ताहिक जळगाव दर्पण च्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.