घोडसगावात महायुतीच्या नेतृत्वाखाली विकासाची दिशा – नागरिकांना आ. चंद्रकांत पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा प्रफुल जवरे

घोडसगावात महायुतीच्या नेतृत्वाखाली विकासाची दिशा – नागरिकांना आ. चंद्रकांत पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा प्रफुल जवरे

घोडसगाव: तालुक्यातील सर्व नागरिकांना आनंदाने कळवण्यात येत आहे की, मागील काही वर्षांत गावात सार्वजनिक हितासाठी महत्त्वपूर्ण विकासकामे करण्यात आली आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत नदीवरून शुद्ध पाणीपुरवठा, डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण रस्ते, पेव्हर ब्लॉक बसविणे, सामाजिक सभागृह, आणि शौचालय बांधणी यासारख्या पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे गावाचा विकास साधला गेला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या योजना यशस्वीपणे राबवल्या गेल्या असून, याचा लाभ प्रत्येक नागरिकाला होत आहे.
याशिवाय, वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, पीएम किसान निधी, पीएम फसल विमा योजना, आयुष्यमान भारत कार्ड, ई-श्रम कार्ड, मोफत धान्य वाटप, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांगांसाठी शासकीय योजना आणि घरकुल अशा विविध योजनांचा समावेश आहे. या सर्व योजनांच्या माध्यमातून घोडसगावातील नागरिकांना अनेक प्रकारे मदत मिळाली असून, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले गेले आहेत.
महायुती सरकारचे नेते ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली हे विकास प्रकल्प राबवण्यात आले आहेत. त्यांच्या निधीतूनच घोडसगावाचा विकास शक्य झाला आहे, जो सर्व ग्रामस्थांनी अनुभवला आहे.
आता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अजून महत्त्वाची कामे बाकी असून ती फक्त या अनुभवी आणि समर्पित नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल जवरे यांनी गावातील नागरिकांना आवाहन केले आहे की, भावनिक आणि अवास्तव आश्वासनांना बळी न पडता महायुतीचे अधिकृत उमेदवार, आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनाच मतदान करून त्यांना धनुष्यबाण चिन्हासमोर बटन दाबून बहुमतांनी विजयी करा.
“आपल्या गावाचा झालेला विकास प्रत्यक्ष अनुभवण्यासारखा आहे. काम करणाऱ्या, गावाच्या विकासाला गती देणाऱ्या आणि जनहिताची निष्ठा ठेवणाऱ्या नेत्यालाच आम्ही पाठिंबा देणार,” असे प्रफुल्ल जवरे यांनी नागरिकांना उद्देशून सांगितले.
(प्रफुल्ल जवरे, ग्रामपंचायत सदस्य, घोडसगाव, भाजपा तालुकाध्यक्ष, मुक्ताईनगर)