आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते, मुक्ताईनगर येथे संत तुकाराम महाराज सभागृहाचे भूमिपूजन

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते,
मुक्ताईनगर येथे संत तुकाराम महाराज सभागृहाचे भूमिपूजन
मुक्ताईनगर येथील शिवरायनगर प्रभाग क्रमांक 12 मध्ये एस एम कॉलेजच्या मागे संत तुकाराम महाराज जयंती चे अवचित्त साधून संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आमदार चंद्रकांत पाटलांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज यांची उपस्थिती होती तर सभागृहाच्या ठिकाणी संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली जाणार असल्याने 50 लक्ष रुपयांच्या निधीमध्ये वाढ करून दोन कोटी रुपयांचा निधी वाढीव मंजूर करणार असल्याची घोषणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना केली याप्रसंगी वारकरी संप्रदाया प्रती असलेली सहिष्णुता आमदारांनी दाखवल्याबद्दल वारकरी व भाविकांतर्फे समाधान व्यक्त केले जात आहे.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, शिवसेना तालुकाप्रमुख नवनीत पाटील,डॉ.उद्धव पाटील, आनंदराव देशमुख , भाजप तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जवरे , शिवसेना शहर प्रमुख प्रशांत टोंगे, संत मुक्ताई मंदिर व्यवस्थापक ह.भ.प.ह.सर्जराव महाराज देशमुख अकोला भ.प. उद्धव जुनारे,ह.भ.प. परमेश्वर महाराज गोंडखेड,ह.भ.प. समाधान महाराज पाटील, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज राजुरा, ह.भ.प. शिवदास महाराज प्रिंप्राळा, ह..भ.प. गजानन महाराज कोल्हे काकोडा, ह.भ.प.हेमंत महाराज महालखेडा, ह.भ.प.किरण महाराज धामणदे, ह.भ.प. कृष्णा महाराज तळणीकर,ह.भ.प. सर्जेराव महाराज देशमुख, ह.भ.प. जनाबाई उत्तम महाराज साळशिंगी, ह.भ.प. शांताराम महाराज पाटील कुरा हरदो,ह.भ.प. रतिराम महाराज खामखेडा, ह.भ.प.लखन महाराज पाटील कांडवेल, ह.भ.प.कडूदास महाराज भोजने काकोडा, ह .भ.प .विनोद महाराज सातोड, ह.भ.प.गुणवंत महाराज पाटील मनुर खुर्द, ह.भ.प दगडू महाराज बोरखेडा,ह.भ.प दिनेश महाराज पाटील चिखली बोदवड, ह.भ.प. लक्ष्मण महाराज पाटील ह.भ.प.विकास महाराज वढवे, ह.भ. प.निखिल महाराज दांडगे, ह.भ.प सचिन महाराज मुलांडे, सुनील नारायण महाजन, ह भ प व्ही के महाजन, किशोर खोडके , बापूसाहेब गावंडे, नितीन कुमार जैन, डा सोपान पाटील.हकीम चौधरी, संदीप जोगी, मुकेश महल्ले, विनोद पाडर, नगरसेवक संतोष कोळी, संतोष मराठे, कीर्तनकार दुर्गा संतोष मराठे, सुरेखा माळी, प्रवचनकार राजकन्या जोगी, अनिता मराठे, यशोदा माळी, सुनिता कदम, योगिता कदम, रोहिणी जोगी, लता माळी, मंगला बनिये, कुसुम बाविस्कर , लिलाबाई कदम, पार्वताबाई कांडेलकर, सरला कदम, मनीषा कदम, यांच्यासह अमरदीप पाटील सचिन पाटील, चेतन कांडेलकर, संदीप पाटील, दीपक नाईक, किरण महाजन, विनोद तोरे, छबीलदास पाटील, हरी माळी, दिलीप बाळू पाटील, श्रीकांत पाटील, शिवाजी मराठे , सुभाष बनिये , रमेश जोगी , के डी पाटील आदींसह असंख्य किर्तनकार, टाळकरी तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गड्डम सर यांनी केले तर आभार छबिलदास पाटील यांनी मानले.