रुईखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

रुईखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला नव्याने रुग्णवाहिकेची सुविधा मिळाली असून, या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते, ग्रामस्थ, तसेच आरोग्य केंद्रातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार चंद्रकांत पाटील यांनी रुग्णवाहिकेची उपयुक्तता व महत्त्व विषद करताना, गावातील नागरिकांना वेळेवर आणि सुलभ आरोग्यसेवा मिळावी हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आणि आरोग्य केंद्राच्या अधिकाधिक विकासासाठी सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. रुग्णवाहिकेच्या लोकार्पणामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थितांचे आभार मानले.