केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील व दिनेश कदम यांची भेट : सामाजिक कार्यावर चर्चा*

*केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील व दिनेश कदम यांची भेट : सामाजिक कार्यावर चर्चा*

मुक्ताईनगर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते दिनेश कदम यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेतली. या भेटीच्या प्रसंगी कदम यांनी पाटील साहेबांना विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा भेट देत सन्मान केला.
या भेटीत तालुक्यातील सामाजिक कार्य आणि आव्हानांवर सखोल चर्चा झाली. सी. आर. पाटील यांनी तालुक्यातील परिस्थिती जाणून घेतली तसेच दिनेश कदम यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. त्यांनी सामाजिक उपक्रम आणि गरजांवर पुढील योजनांसाठी विचारमंथन केले.
दिनेश कदम यांच्या समाजसेवेचे कौतुक करताना, पाटील साहेबांनी आवश्यक सहकार्य आणि पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. या भेटीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याने तालुक्यातील जनतेसाठी सकारात्मक पाऊल उचलले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
ही भेट प्रसंगी साहेबांचे चिरंजीव जिग्नेश चंद्रकांत पाटील.बाळकृष्ण पाटील. अनिल पाटील. ज्ञानेश्वर पाटील. गजानन पाटील. विश्वनाथ पाटील. रामराव पाटील. आधी उपस्थित होते.