मुक्ताईनगरच्या प्रवर्तन चौकातील शिवसृष्टीच्या कामाची आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहणी

मुक्ताईनगरच्या प्रवर्तन चौकातील शिवसृष्टीच्या कामाची आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहणी
मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी शिवसृष्टी प्रकल्प कामाची आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली. या प्रकल्पाच्या अंमलबजावणी दरम्यान उद्भवणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट दिली.
कामामध्ये अडथळा ठरणाऱ्या विद्युत रोहित्र, विजेच्या तारा व पोल स्थलांतरित करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार पाटील यांनी संबंधित विभागांनी समन्वय साधून कामाची गती वाढवावी आणि प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल, यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिवसेना-युवासेना पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनीही या पाहणीला हजेरी लावली.
शिवसृष्टी प्रकल्पामुळे शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला अधिक बळ मिळणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.