muktai nagar

*स्नेहल एकनाथ कोळीचा दहावी परीक्षेत ९३ टक्क्यांसह उज्वल यश

*स्नेहल एकनाथ कोळीचा दहावी परीक्षेत ९३ टक्क्यांसह उज्वल यश..,*

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – सरदार वल्लभभाई पटेल विद्या विकास संस्था संचलित आदर्श इंग्लिश मिडीयम प्रायमरी व सेकंडरी स्कूल, मुक्ताईनगर येथील विद्यार्थिनी स्नेहल एकनाथ कोळी हिने मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवून शाळेचा व कोळी कुटुंबाचा नावलौकिक उंचावला आहे.

स्नेहल ही उचंदा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एकनाथ चुडामन कोळी यांची सुकन्या असून, तिच्या या यशाने संपूर्ण कुटुंबात व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कठोर अभ्यास, जिद्द, चिकाटी, तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे मोलाचे पाठबळ यामुळेच हे यश शक्य झाल्याचे स्नेहलने नमूद केले.

शाळेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी तिच्या यशाचे विशेष कौतुक करत अभिनंदन केले आहे. स्नेहलने सांगितले की, “नियमित अभ्यास, योग्य वेळापत्रक आणि आई-वडिलांचे प्रोत्साहन हेच माझ्या यशाचे गमक आहे.”

तिच्या या घवघवीत यशाने इतर विद्यार्थ्यांसाठी ती एक प्रेरणादायी आदर्श ठरली आहे. शाळेतील सहाध्यायी, शिक्षक, पालक वर्ग व ग्रामस्थांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button