गुणवत्तेच्या यशपथावर चालताना संस्कारांची सावली विसरू नका” — API राजेंद्र चाटे यांचा विद्यार्थ्यांना संदेश...

“गुणवत्तेच्या यशपथावर चालताना संस्कारांची सावली विसरू नका” — API राजेंद्र चाटे यांचा विद्यार्थ्यांना संदेश…
उचंदे (ता. मुक्ताईनगर)
तापी-पूर्णा परिसर विद्या प्रसारक मंडळ संचलित घाटे आनंदा शंकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, उचंदे येथे दहावी व बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंडळाचे अध्यक्ष माणिकराव जगन्नाथ पाटील यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे ए.पी.आय. राजेंद्र चाटे उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना API चाटे यांनी विद्यार्थ्यांना सखोल आणि प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिक्षणात उजळ यश मिळवताना केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसं नाही. तुमच्या पाठीमागे उभे असलेले पालक, शिक्षक आणि समाज यांचे योगदान विसरू नका. यशाच्या वाटचालीत शिस्त, कृतज्ञता आणि मूल्यांचा आधार असेल, तर आयुष्यातील कोणतीही परीक्षा कठीण वाटणार नाही.”
या गौरव समारंभास मंडळाचे सचिव रामभाऊ पाटील, उपाध्यक्ष भागवत पाटील, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व संचालक यु.डी. पाटील, संतोष देविदास पाटील, पोलीस पाटील जितेंद्र पाटील, पत्रकार छबिलदास पाटील, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन डी.पी. मस्का-दे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार राजू पाटील व देवानंद पाटील यांनी मानले.
—
यशस्वी निकालांची तेजस्वी कामगिरी : ८९.६६ टक्के निकाल
एकूण १४५ विद्यार्थ्यांपैकी १३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत निरज सचिनकुमार पाटील याने ९२% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला, तर कोमल काशीराम पाटील (९१%) व निकिता योगेश पाटील (८९.६०%) यांनी अनुक्रमे द्वितीय
तृतीय धृवेश योगेश पाटील 89.60 स्थान पटकावले.