सावद्यात रोहिणी खडसे यांच्या प्रचारार्थ खा. अमोल कोल्हे यांचा भव्य रोड शो – नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावद्यात रोहिणी खडसे यांच्या प्रचारार्थ खा. अमोल कोल्हे यांचा भव्य रोड शो – नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावदा – राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार रोहिणी खडसे यांच्या प्रचारासाठी सावदा शहरात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत भव्य रोड शो आयोजित करण्यात आला. या रोड शोची सुरुवात सावदा बसस्थानकासमोरील दुर्गामाता मंदिरापासून झाली, आणि त्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरून प्रचार रॅली काढण्यात आली.
खा. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमुळे या रोड शोला विशेष महत्त्व लाभले असून, नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. शहरातील विविध ठिकाणी नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले आणि मोठ्या संख्येने सहभागी होत जोरदार प्रतिसाद दिला.
रोहिणी खडसे यांच्या प्रचारासाठी नागरीकांमध्ये झालेली ही जागृती महाविकास आघाडीच्या उमेदवारांबद्दल असलेला विश्वास आणि पाठिंबा दर्शवते.