muktai nagar

मतदारसंघ संवेदनशील करण्याची मागणी किती घातक, किती फायद्याची ? वाचा, अर्थतज्ञांच्या मते

 

विश्वनाथ बोदडे
अर्थतज्ञ नाशिक

मुक्ताईनगर मतदारसंघ सुरक्षित आहे का संवेदनशील जाहीर करायला पाहिजे का ? आणि कशामुळे
तुम्हाला कळले असेल की याचे महत्त्व काय आहे जेव्हा निवडणूक येतात तेव्हा असे मुद्दे का येतात अणि बोलणाऱ्या राजकीय व्यक्ती किती विकासासाठी सक्षम आहे हे सुद्धा स्पष्ट होते

राजकारणी आपसापसामध्ये काही घटना घडत असतात परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजदार राजकारणी माणूस आधी आपली आपल्या मतदारसंघाची इभ्रत जगासमोर मांडत नाही
जर मतदारसंघांमध्ये काही अप्रिय घटना घडत असतील तर त्याची चौकशी करणे हे नेमून दिलेल्या यंत्रणेचे काम असते आणि ज्याला समस्या आहे त्यांनी त्यांची समस्या यंत्रणे समोर मांडणे गरजेचे आहे

*मतदारसंघ संवेदनशील जाहीर झाला तर त्याचे भविष्यामध्ये वाईट पडणारे पडसाद काय असतात*

आपण सर्व जाणतात की बिहार उत्तर प्रदेश आणि काही इतर राज्यांमध्ये संवेदनशील जे मतदार संघ आहे त्या मतदारसंघाचा अजून सुद्धा विकास झालेला नाही त्याचे मुख्य कारण काय तर तिथल्या राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती आणि *उद्योजक अशा ठिकाणी आपली गुंतवणूक करायला घाबरतात जर उद्योजकांनी उद्योजक आणले नाही परिणामी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळणार नाही व्यापारी पेठ चालणार नाही चलनाची क्रयविक्रीय शक्ती कमी होते परिणाम आणि त्या मतदारसंघाचा विकास हा थांबून जातो*

*एखाद्या मतदारसंघांमध्ये नुसतच उद्योग थांबत नाही तर सगळे सोयरी जोडणे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रवेश त्याचबरोबर सुशिक्षित लोकांना असुरक्षित वाटतं*

यासाठी राजकीय इच्छाशक्ती सकारात्मक बाळगून आपला मतदारसंघ कसा चांगला आहे हे नेहमीच आपण मीडियाच्या समोर मांडले पाहिजे हे मांडत असताना मी सरकार मध्ये आहे किंवा नाही आहे याचा विचार न करता मी जनतेच्या भल्यासाठी विकासासाठी काम करतो आहे आणि करीत राहील त्यासाठी माझ्या मतदारसंघांमध्ये उद्योगाची नाडी आणली असेल आर्थिक नळी बळकट करायची असेल तर मात्र सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र मिळून या विषयावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे ऊणे धुणे काढणे एकमेकांवर आरोप करणे हा राजकीय किंवा प्रचाराचा एक भाग असू शकतो परंतु समाजातील कोणत्याही व्यक्तीला हे पटणार नाही की आपला मतदारसंघ हा संवेदीशील असायला हवा
आणि विकास थांबवावा
गेल्या 30 वर्षांमध्ये संत मुक्ताईनगर मतदारसंघाचा विकास काही प्रमाणात झाला परंतु ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने झाला नाही त्याच्या मागची भूमिका आहे की राजकीय इच्छाशक्ती पारिवारिक आणि फक्त सर्व माझ्या घरात पाहिजे यासाठी जे प्रयत्न आहे त्यामुळेच हा प्रश्न उपस्थित झालेला आहे
जनतेला सर्व कळते हे आपण मान्य करायला पाहिजे आणि जनतेच्या माध्यमातून जे कार्यकर्ते आपल्या सोबत असतात त्यांना सुद्धा खूप घनिष्ठ कडते हेही मान्य करायला पाहिजे जनतेची अपेक्षा असते की राजकीय पटलावर गेल्यानंतर या व्यक्तीने माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी माझ्या मतदारसंघातील जनतेसाठी काय विकास केला आहे हे अभ्यासपूर्ण गरीबातला गरीब सुद्धा माणूस सकारात्मक दृष्टीने बघत असतो
हा संपूर्णपणे गैरसमज आहे की एका दिवसात राजकारण बदलते आणि काही आर्थिक लोकांच्या माध्यमातून जनता मतदान करते हा खूप मोठा गैरसमज आहे
*पब्लिक सब जानती है पैसा भी लेती है लेकिन वोट विकासाला देते हैं*

आता जनता सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष त्यांच्या घरी काय गेले याच्या माध्यमातून त्यांना कळतो की आपल्यासाठी कोण काम करत आहे पूर्वी असं होतं की विकास आणि अविकास याच्याशी जनतेशी काही घेणे देणे नव्हतं परंतु जी जनता अशिक्षित होती त्यांचे मुलं मुली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या वाघिणीच्या दुधामुळे म्हणजेच शिक्षणामुळे आज बोलायला लागली आहे विचारा लागली आहे आणि त्या माध्यमातून काय प्रत्यक्ष परिस्थिती आहे त्यावर व्यक्त होत आहे त्यामुळे वरचा जो शीर्षक आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button