तरुणांनी नोकरीकडे न आवडता व्यवसायाकडे गेले पाहिजे – उद्योजक आर. एस. पाटील

तरुणांनी नोकरीकडे न आवडता व्यवसायाकडे गेले पाहिजे – उद्योजक आर. एस. पाटील
बुरहानपूर: क्षत्रिय मराठा मंगल कार्यालय येथे मराठा व्यवसाय संघाच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी “तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसाय उभा करावा व समाजाचे भविष्य उज्ज्वल करावे”, असे आवाहन प्रमुख पाहुणे उद्योजक आर. एस. पाटील, प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघ, इंदूर यांनी केले.

कार्यक्रमात खासदार ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रमाता जिजाऊ यांचे वंशज शिवाजीराव जाधव (बुलढाणा), उद्योजक नेत्रदीप चौधरी, सुनील महाजन (कार्याध्यक्ष, मध्य भारत मराठा सेवा संघ), दिनेश कदम (राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा वसतिगृह कक्ष), व्याख्याते अक्षय राऊत (अकोला), उद्योजक संदीप पाटील (सुरत), क्षेतीष गायकवाड (कोल्हापूर), प्रविण पाटील (पुणे), भूपेंद्र चव्हाण, अनिल भोसले (माजी नगराध्यक्ष), प्रमोद महाजन (राष्ट्रीय अध्यक्ष, दत्तक परिषद), गणेश महाजन (राष्ट्रीय अध्यक्ष, सहकार परिषद), व सुरेखा ससाने (राष्ट्रीय तनुबाई पत्रकार परिषद) यांसारख्या मान्यवरांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे आयोजन मराठा व्यवसाय संघ प्रदेशाध्यक्ष पंकज पाटील, जिल्हाध्यक्ष उज्वल मराठे, जिल्हा सचिव धीरज महाजन, जिल्हा उपाध्यक्ष सदिप चौधरी, जिल्हा खजिनदार धीरज पवार, आणि जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब चौधरी यांनी केले.
या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी मराठा समाजातील तरुणांनी नोकरीकडे न वळता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, उद्योग क्षेत्रात प्रगती करून स्वतःचे आणि समाजाचे भविष्य घडवावे, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात तरुणांसाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. समाजातील तरुणांना व्यवसायासाठी भांडवल, उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे धोरण, व सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी लागणारी कौशल्ये याबद्दल माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठा व्यवसाय संघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.