संतोष मराठे ‘जिल्हा प्रसिद्धी प्रमुख’, निलेश मेढे ‘तालुका प्रसिद्धी प्रमुख’ पदावर नियुक्त!

संतोष मराठे ‘जिल्हा प्रसिद्धी प्रमुख’, निलेश मेढे ‘तालुका प्रसिद्धी प्रमुख’ पदावर नियुक्त!
मुक्ताईनगर (ता. २४ जुलै) :
वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा ज्वलंत हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची कार्यशैली आत्मसात करत शिवसेना पक्ष संघटनेला नवे बळ देण्यासाठी मुक्ताईनगरमध्ये दोन महत्त्वाच्या पदांवर नवे चेहेरे रुजू झाले आहेत.
शिवसेना मुख्यनेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार व शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी आणि मुक्ताईनगरचे आमदार मा. चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली –
✅ नगरसेवक व पत्रकार संतोष सुपडू मराठे यांची ‘जिल्हा प्रसिद्धी प्रमुख (कार्यक्षेत्र – रावेर लोकसभा)’
✅ निलेश मोहन मेढे यांची ‘मुक्ताईनगर तालुका प्रसिद्धी प्रमुख’
पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या स्वाक्षरीनिशी नियुक्तीपत्र सुपूर्द करण्यात आले. या नेमणुकीमुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीला नवे बळ मिळणार असल्याची चर्चा आहे.
सत्कार समारंभात उपस्थित मान्यवर :
या वेळी आमदार मा. चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, उपजिल्हा प्रमुख छोटू भोई, तालुका प्रमुख नवनीत पाटील, शहर प्रमुख प्रशांत टोंगे, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे कार्याध्यक्ष अफसर खान, सोशल मिडिया जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, व्यापारी आघाडी अध्यक्ष नितीन जैन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेच्या प्रचार-प्रसाराला नवसंजीवनी देण्याची जबाबदारी
शिवसेनेच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्याची इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियात प्रभावीपणे प्रसिद्धी करून पक्षवाढीस हातभार लावण्याची जबाबदारी मराठे आणि मेढे यांच्यावर सोपवण्यात आली असून, पक्षातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभेल, असा विश्वास दोघांनीही यावेळी व्यक्त केला.