३३ वर्षानंतर पुन्हा भरला दहावीचा वर्ग – घाटे ए.एस. विद्यालय, उचंदे माजी विद्यार्थी मेळावा

३३ वर्षानंतर पुन्हा भरला दहावीचा वर्ग – घाटे ए.एस. विद्यालय, उचंदे माजी विद्यार्थी मेळावा
मुक्ताईनगर: घाटे ए.एस. विद्यालय व जुनिअर कॉलेज, उचंदे येथील 1990-91 दहावीच्या तुकडीचे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा भावनिक पुनर्मिलन मेळावा आयोजित करण्यात आला. ३३ वर्षांच्या कालावधीनंतर, हे विद्यार्थी-विद्यार्थिनी पुन्हा एकत्र आले. जीवनाच्या विविध वाटा घेतलेल्या आणि एकमेकांपासून दूर गेलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून या मेळाव्याचे आयोजन केले.
जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुख्याध्यापक व 1990-91 सालातील शिक्षकांना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले. या सोहळ्यात सर्व शिक्षकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांशी आठवणींचा धागा जोडला. मुख्याध्यापक व त्या काळातील शिक्षकांनी या विद्यार्थ्यांच्या जुन्या शाळेत केलेल्या आठवणींना उजाळा दिला, त्यांच्या करामतींवर गमतीशीर कथा सांगितल्या, आणि त्यांच्या यशाबद्दल कौतुक व्यक्त केले.
ऋणानुबंध सोहळा – मैत्रीचा आणि आठवणींचा क्षण
या स्नेहमेळाव्यात सर्व माजी विद्यार्थ्यांचे, तसेच शिक्षक व गुरुजनांचे सन्मानपूर्वक स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रमुख उपस्थितीत श्री. यु. डी. पाटील, वाय. के. पाटील, पी. जी. तायडे, आर. बी. पाटील, एन. यु. पाटील मॅडम, व्ही. पी. पाटील, आणि आर. डी. चौधरी यांचा समावेश होता. संस्थेचे अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष भागवत पाटील, सचिव रामभाऊ पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आणि संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
यशाच्या शिखरावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी
हा मेळावा विशेष कारणाने लक्षवेधी ठरला. 1990-91 च्या तुकडीतून अनेक विद्यार्थ्यांनी शासकीय नोकरीत यश मिळवले आहे, तर काही विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून समाजात आपले योगदान दिले आहे. विद्यार्थिनी देखील विविध शासकीय नोकरीत कार्यरत असून समाजात आपली ओळख निर्माण करत आहेत. या स्नेहमेळाव्यात शेकडो माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.
माजी सहाध्यायींच्या आठवणींनी भारावलेल्या या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शाळेत घडलेल्या लहान-मोठ्या घटनांची गमतीशीर किस्से शेअर करत भावना