muktai nagar

मुक्ताईनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापन संपूर्ण तालुक्यात करण्यात आला जल्लोष…

मुक्ताईनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापन संपूर्ण तालुक्यात करण्यात आला जल्लोष…

HTML img Tag Simply Easy Learning    

मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात सुमारे चार कोटी रुपये निधीतून मंजूर आणि प्रगतीत असलेल्या शिवसृष्टीमध्ये सुमारे 30 फूट उंचीच्या चबुतरावर 25 फूट उंचीचा अतिशय रुबाबदार ब्रांच धातूचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा 16 नोव्हेंबर रोजी हजारो शिवप्रेमी व समाज बांधवांच्या उपस्थितीत स्थापन करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय, आस्ते कदम आस्ते कदम महाराज!” अशा गगनभेदी घोषणांनी व गर्जनांनी मुक्ताईनगर शहर दुमदुमून गेले होते ठीक ठिकाणी पुष्पवृष्टी करून शिवरायांच्या पुतळ्याचे स्वागत देखील संपूर्ण शहरातून केले गेले. ##अतिशय दिमाखात पुतळा स्थापन – सकाळी 11 वाजेच्या सुमारास खामखेडा पुलाकडून मुक्ताईनगर शहराकडे पुतळ्याच्या आगमनाला सुरुवात झाली. ठीक ठिकाणी पुष्पवृष्टीने शिवरायांच्या पुतळावर स्वागत करण्यात आले. प्रवर्तन चौकात पुतळा आल्यानंतर क्रेनच्या साह्याने नियोजित ठिकाणी चाबुतर्या स्थळी स्थापन झाल्यावर शिवप्रेमी बांधवांनी एकच जल्लोष केला. यावेळी सर्वांच्या अंगावर आनंदाचे रोमांचकारी शहारे आले होते. स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर आदिशक्ती श्री संत मुक्ताईच्या पावनभूमी तीर्थक्षेत्र असलेल्या मुक्ताईनगर इतर संपूर्ण मुक्ताईनगर वासियांचे स्वप्न असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे आगमन दिमाखात झाल्याने सर्वांच्या मनात आनंदाची लहर उमटली होती. विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थिती राहून पुष्पवृष्टी करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या आगमन केले. रात्री उशिरा पुतळा स्थापन झाल्यानंतर महाआरती करून पुतळा स्थापन सोहळ्याचे सांगता करण्यात आली. मुक्ताईनगर शहरात पुतळा विराजमान व्हावा यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता, तर जय शंभुराजे बहुउद्देशीय संस्था मुक्ताईनगर यांच्या वतीने देखभाल दुरुस्तीची हमी देऊन तसेच शासनाकडून पुतळा परवानगीसाठी मागण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून परवानगी मिळवलेली होती. त्यानंतर येथे सुमारे चार कोटी रुपयांच्या शिवसृष्टी देखील मंजूर झालेले असून या ठिकाणचे काम आता प्रगतीपथावर आहे.त्यामुळे भविष्यात आदिशक्ती संत मुक्ताई च्या दर्शनाचे येणारा भाविक वारकरी तसेच पर्यटक यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन देखील व आकर्षक शिवसृष्टीचा आनंद देखील लुटता येणार आहे. पुतळा बसवण्यात आला याप्रसंगी छोटू भोई, सुनील पाटील, नवनीत पाटील, पंकज राणे, अफसर खान, माजी समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष अनंतराव देशमुख, मराठा सेवा संघ राष्ट्रीय वस्तीगृह कक्ष अध्यक्ष दिनेश कदम, संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख रविंद्र हरणे महाराज, मुक्ताबाई मंदिराचे व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज, पंकज महाराज पाटील, चेतन महाराज मराठे, प्रफुल्ल पाटील, दीपक खुळे, संतोष माळी, महेंद्र बोदडे, पियुष मोरे, मुकेश वानखेडे, बबलू कोळी, आरिफ आजाद, युनूस खान, नूर मोहम्मद खान, आसिफ बागवान, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष नितीन जैन, मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीचे विवेक ठाकूर ,अतुल हिंगवणेकर ,विनोद नायर ,धनंजय सापधरे, शुभम तळेले, तुषार बोरसे, उज्वल बोरसे, दिनेश भालेराव, दिलीप भालेराव, नाना बोदडे , मुशिर मणियार, शकूर जमदार, सलीम खान, जाफर अली ,शकील शेख ,हरून मेंबर ,सुभाष बनीये, शिवराज पाटील यांच्यासह ह भ प दुर्गा संतोष मराठे ,अनिता मराठे ,नीलिमा वंजारी, मंगला बनिये ,नीता पाटील, आलका मराठे, मनीषा कांडेलकर यांच्यासह हजारो शिवप्रेमी बंधू-भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या सर्वांनी या अद्भुत सोहळ्याचा “याची देहा याची डोळा” अशी अनुभूती घेतली यावेळी संपूर्ण परिसर हा चैतन्यदायी वातावरण व ढोल ताशांच्या आणि डीजेच्या गजरात दुमदुमून गेला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button