सकल मराठा समाजाची मागणी: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करा

सकल मराठा समाजाची मागणी: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करा

मुक्ताईनगर (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील तरुण सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येमुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात सकल मराठा समाज, मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात आरोपींना तात्काळ अटक करून मुख्य सूत्रधाराला गजाआड करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्याची मागणी करत या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा देण्याचा आग्रह व्यक्त करण्यात आला.
निवेदनाचा रोख
निवेदनात मराठा समाजाने संतोष देशमुख यांच्या हत्येचे तीव्र शब्दांत निषेध केला असून, ही हत्या समाजाच्या एकोपा व सुरक्षिततेवर घाला असल्याचे नमूद केले आहे. या हत्याकांडातील आरोपींना तातडीने अटक न केल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
प्रमुख उपस्थिती
या निवेदन मराठा समाजबांधवांनी हजेरी लावली. उपस्थित मान्यवरांमध्ये अध्यक्ष आनंदराव देशमुख, कुऱ्हा विभागाचे अध्यक्ष नवनीत पाटील, दिनेश कदम, ज्ञानेश्वर पाटील, सोपान दुत्ते, प्रफुल जवरे, युवराज पाटील, सचिन पाटील, दिपक वाघ, विनोद पाटील, विजय पाटील, उमेश पाटील, डी.के. पाटील, जितेंद्र पाटील, साहेबराव पाटील, वासुदेव महाजन, संदीप चौधरी, बाबुराव पाटील, गणेश थेटे, सुभाष बनिया, संजय मराठे, प्रफुल पाटील, छोटू पाटील, संदीप घईट, गोलू मु-हे, सुभाष पाटील, उमेश पाटील, प्रदीप कोल्हे, ललित बावस्कर, संतोष मराठे, दिलीप पाटील, मोहन महाजन, संदीप शिंदे, गोपाळ धुंदे, देवेद काटे, आणि इतर समाजबांधव यांचा समावेश होता.
सामाजिक एकजूट आणि न्यायाची मागणी
या घटनेने समाजातील तरुण पिढीला असुरक्षिततेचा धोका निर्माण केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेत्याची अशी क्रूर हत्या होणे, हे संपूर्ण समाजासाठी धक्कादायक आहे. यावेळी उपस्थितांनी एकमुखाने न्यायाच्या मागणीसाठी लढा देण्याचा निर्धार केला.
राज्यभर आंदोलनाची तयारी
सकल मराठा समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध करताना, आरोपींना लवकरात लवकर शिक्षा न झाल्यास समाजाच्या एकजुटीतून राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी उपस्थितांनी “संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने उचललेले पाऊल हे अन्यायाविरोधातील एकजुटीचे प्रतीक असून, यामुळे समाजाला आपले हक्क मिळवण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले.