
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कुंडगावात अभिवादन
मुक्ताईनगर (कुंडगाव): महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कुंडगाव येथे भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या निमित्त कँडल रॅलीचे आयोजन करण्यात आले, त्यानंतर बुद्ध वंदना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमात राजू वानखेडे व पंकज हिरोळे यांनी मार्गदर्शन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची महती उपस्थितांना समजावून सांगितली.
या कार्यक्रमाला गावातील अनेक मान्यवर व बुद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये विनोद हिरोळे, पोलीस पाटील अरुण जाधव, सिद्धार्थ हिरोळे, विजय हिरोळे, अलका हिरोळे, विजेता हिरोळे, जिजाबाई धुरंधर, शैलाबाई हिरोळे, कल्पना रायपुरे, विमल बाविसाने, रेखा इंगळे, संगीता रायपुरे, सारिका बावस्कर, मनीषा वानखेडे, शर्मिला हिरोळे, आशा हिरोळे, निर्मलाबाई शिरोळे, प्रमिलाबाई बावीसाने, मंगलाबाई इंगळे, सुनंदा तायडे यांचा समावेश होता.
गावातील सर्व उपस्थित बुद्ध उपासक-उपासिकांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण केले आणि त्यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाने गावात सामाजिक ऐक्य व बंधुभावाची भावना वृद्धिंगत झाली.