मुक्ताईनगरच्या आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानभवनाच्या पायरीला माथा टेकून घेतली सदस्यत्वाची शपथ..

मुक्ताईनगरच्या आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानभवनाच्या पायरीला माथा टेकून व विधानसभा अध्यक्षांसमोर घेतली शपथ..
मुक्ताईनगर, : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईतील विधानभवनात आपल्या आमदार पदाची शपथ घेतली. विधानभवनाच्या पायरीवर माथा टेकून श्रद्धा व्यक्त केल्यानंतर त्यांनी आत प्रवेश केला आणि आपल्या कर्तव्याची सुरुवात केली.

शपथविधीप्रसंगी बोलताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, “मुक्ताईनगर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी माझ्या आमदार पदाची शपथ घेतली आहे. संविधानाच्या चौकटीत राहून निष्ठा, कर्तव्यभावना आणि प्रामाणिकपणे माझ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा दृढसंकल्प यावेळी केला आहे. नव्या भूमिकेत देखील मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी मी कटिबद्ध राहील.”
या शपथविधी कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यांच्या साक्षीने चंद्रकांत पाटील यांनी संविधानानुसार आमदार पदाची शपथ घेतली.
शपथविधीनंतर चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी विविध योजनांवर काम करण्याचा संकल्प केला. “प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवणे, विकास कामांना गती देणे, आणि नव्या संधी निर्माण करण्यासाठी माझे प्रयत्न अविरत सुरू राहतील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मतदारसंघातील जनतेमध्ये या घटनेचा अभिमान असून चंद्रकांत पाटील यांच्या पुढील कार्यकाळाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.