*महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा – माजी नगराध्यक्षा नजमा तडवी*

*महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा – माजी नगराध्यक्षा नजमा तडवी*

मुक्ताईनगर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर यशस्वीपणे राबविण्याचे श्रेय महायुतीचे उमेदवार आमदार चंद्रकांत पाटील यांना जाते, असे मत मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा व भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष नजमा तडवी यांनी व्यक्त केले.
त्या म्हणाल्या, “आमदार चंद्रकांत पाटील यांनी या योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. विशेषतः, प्रत्येक गावात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून, लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले आहेत.”
नजमा तडवी यांनी पुढे सांगितले की, “चंद्रकांत पाटील यांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन विकासकामे केली आहेत. त्यांचे नेतृत्व हे केवळ विकासाला प्रोत्साहन देणारे नाही, तर सर्वसमावेशकता आणि सामाजिक न्यायाला प्राधान्य देणारे आहे.”
महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करताना त्या म्हणाल्या, “तालुक्याच्या विकासासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी असे नेतृत्व पुन्हा निवडणे अत्यावश्यक आहे.”
ही निवडणूक चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या मार्गाला आणखी बळ देईल, असा विश्वास तडवी यांनी व्यक्त केला.