मुक्ताईनगरात चंद्रकांत पाटील पुन्हा ठरले ‘जायंट किलर’…
अॅड. रोहिणी खडसेंचा २३ हजार ९०४ हजार मतांनी पराभूत

मुक्ताईनगरात चंद्रकांत पाटील पुन्हा ठरले ‘जायंट किलर’…

अॅड. रोहिणी खडसेंचा २३ हजार ९०४ हजार मतांनी पराभूत
विशेष प्रतिनिधी -सचिन पाटील
मुक्ताईनगरः विधानसभा निवडणूकीत राज्याचे लक्ष लागलेल्या मुक्ताईनगर मतदार संघाच्या निवडणूकीत शिवसेना शिंदे गटाचे आ. चंद्रकांत पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणत शरद पवार गटाच्या अॅड. रोहीणी खडसेंचा तब्बल २३ हजार ९०४ मतांनी पराभव केला. चंद्रकांत पाटील यांनी अस्तित्व कायम राखले असले आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. चंद्रकांत पाटील यांना १ लाख ११ हजार ६०१ मते मिळाली तर रोहीणी खडसेंना ८७ हजार ६५६ मते मिळाली.
शहरातील संत मुक्ताबाई महाविद्यालयाच्या क्रीडा संकुल वरील बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला टपाली मतदान व त्यानंतर ईव्हीएम मधील मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी २० टेबलवर मतमोजणी करण्यात आली. यात १४ टेबल ईव्हीएम मशीन मधील मते मोजण्यासाठी तर सहा टेबल टपाली मतदान मोजणी साठी ठेवण्यात आली होती. २३ फेऱ्याअंती दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी आ. चंद्रकांत पाटील यांना १ लाख ११ हजार ६०१ तर रोहिणी खडसे यांना ८७ हजार ६५६
*हा विजय जनतेला समर्पित, घराणेशाहीचा अंतः चंद्रकांत पाटील*
हा विजय मतदारसंघातील जनतेचा विजय असून सर्व महायुतीच्या कार्यकर्ते यांनी फार मेहनत घेतली आहे, ही कामाची पावती असून खऱ्या अर्थाने आज कार्यकर्ता राज्यकर्ता बनला असुन घरणेशाहीचा अरणेशाहीचा अंत असल्याची भावना अशी भावना विजयानंतर आ. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
इतके मते मिळाली. यावेळी २३ हजार ९०४ इतक्या मताधिक्काने आ. चंद्रकांत पाटील यांना विजयी घोषित करण्यात आले.
-
आ.चंद्रकांत
पाटलांची आघाडी कायम पहिल्या फेरीपासूनच
आ. चंद्रकांत पाटील यांनी मतांमध्ये आघाडी घेतली होती. जस-जशी आ.चंद्रकांत पाटील यांना प्रत्येक फेरीत आघाडी मिळत होती तस-तसा कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. शेवटच्या फेरी पयरंत चंद्रकांत पाटील यांची आघाडी कायम राहीली व ते
विजयाचे शिल्पकार ठरले. मुक्ताईनगरात गुलालाची उधळण
यावेळी कार्यकर्त्यांनी शहरात विजयी मिरवणूक काढून जल्लोष केला तसेच डीजे आणि ढोल ताशांच्या तालावर ठेका देखील धरला व मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात मोठ्या प्रमाणात गुलाल उधळला तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी देखील केली व मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटील हे विजयाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी संत मुक्ताबाई महाविद्यालयातील मतमोजणी हॉल येथे गेले त्यानंतर मिरवणुकी मार्गातील प्रवर्तन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन