मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना मुस्लिम समाजाचा भक्कम पाठिंबा – विरोधकांचा धार्मिक द्वेषाचा प्रयत्न निष्फळ-अफसर खान

मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना मुस्लिम समाजाचा भक्कम पाठिंबा – विरोधकांचा धार्मिक द्वेषाचा प्रयत्न निष्फळ-अफसर खान

मुक्ताईनगर: विधानसभा निवडणुकीत आता अंतिम टप्प्यात आलेला प्रचार आणि जनतेतून उमटत असलेले प्रतिक्रियांचे स्वर, या सर्वांचा धागा पकडून मुक्ताईनगर मतदारसंघात सध्या एकच नाव जनतेच्या मनात घर करून बसले आहे, ते म्हणजे महायुतीचे उमेदवार आ. चंद्रकांत भाऊ पाटील.
मुस्लिम समाजातील नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरलेले चंद्रकांत पाटील, त्यांच्या प्रामाणिक कार्यामुळे मुस्लिम समाजाचे मन जिंकले आहे. गेल्या 30 वर्षांत ज्या नेत्यांनी मुस्लिम समाजाचे मत घेऊन आश्वासनांवरच थांबवले, त्यांना या निवडणुकीत मुस्लिम समाजाने नाकारले आहे. विरोधी पक्षांतील काही नेत्यांनी मुस्लिम समाजात धार्मिक द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला असला तरी, त्याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही.
आ. चंद्रकांत पाटील यांनी आश्वासनांचा आधार न घेता प्रत्यक्षात विविध विकासकामे करून मुस्लिम समाजासाठी आपली बांधिलकी सिद्ध केली आहे. मुस्लिम समाजासाठी त्यांनी सुसज्ज विवाह हॉल, कब्रिस्तानांसाठी रस्ते आणि शाळांची उभारणी यांसारखी महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. तसेच लाडली बहिण योजनेच्या लाभाचे प्रकरण असो की संजय गांधी निराधार योजना, मुस्लिम समाजातील प्रत्येक नागरिकांपर्यंत या योजना पोहचवण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन काम करण्याचे आदेश दिले.
शिवसेना अल्पसंख्यक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान मझहर खान यांनी मुस्लिम समाजाच्या भावना व्यक्त करत सांगितले की, “आ. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या कार्याची परतफेड करण्यासाठी मुस्लिम समाज संपूर्ण ताकदीने सज्ज आहे.” मुस्लिम समाजातील नागरिकांनी निर्धार केला आहे की, येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाण चिन्हाला मतदान करून चंद्रकांत भाऊ पाटील यांना विजयी करून आपल्या कृतज्ञतेचा प्रत्यय देणार.
या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी मुस्लिम समाजाचा जो अभूतपूर्व पाठिंबा उभा आहे, तो त्यांच्या कामाचे प्रतीक मानला जात आहे.