muktai nagar

शिक्षणासोबतच संस्कार महत्त्वाचे — प्रदीप दाणे सुकळी विद्यालयात संपन्न झाली तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा

शिक्षणासोबतच संस्कार महत्त्वाचे — प्रदीप दाणे

HTML img Tag Simply Easy Learning    

सुकळी विद्यालयात संपन्न झाली तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा

मुक्ताईनगर — आज स्पर्धेच्या युगात विद्यार्थी मर्यादित म्हणजेच केवळ परीक्षा केंद्रित बनलेले आहेत.अवांतर वाचन मात्र बंद आहे.त्यामुळे एखादी जरी समस्या आली तरी मुले आत्मविश्वास गमावतात,वाम मार्गाला जातात किंवा व्यसनाधीनतेकडे वळतात.असे होऊ नये म्हणूनच शिक्षणासोबत संस्कार महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक प्रदीप दाणे यांनी केले. मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील नवीन माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या , जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या विद्या समितीतर्फे आयोजित तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष मुख्याध्यापक एन.डी.काटे , उपशिक्षक पवन पाटील , उपशिक्षक जितेंद्र दुट्टे , उपशिक्षिका श्रीमती वैशाली राजपूत आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक शरद बोदडे यांनी केले. याप्रसंगी मुख्याध्यापक एनडी काटे यांनी तसेच श्रीमती वैशाली राजपूत यांचीही समायोजित भाषणे झाली. तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेत पहिल्या गटात प्रथम सुकळी विद्यालयाची विद्यार्थिनी कु. तनुष्का सुनील वाघ (इयत्ता 7वी ) , दुसऱ्या गटात प्रथम श्री एस बी चौधरी हायस्कूल चांगदेवची विद्यार्थिनी कु.अक्षरा निलेश पाटील (इयत्ता 9वी) तर तिसऱ्या गटात संत मुक्ताबाई जुनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु.रिद्धी प्रमोद पाटील ( इ.12 वी कॉमर्स ) या विद्यार्थिनींनी वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केले.वकृत्व स्पर्धेसाठी पहिला गट इयत्ता पाचवी ते सातवीसाठी
निसर्गाप्रती माझे कर्तव्य , दुसरा गट इयत्ता आठवी ते दहावीसाठी बाप माझा शेतकरी , उभ्या जगाचा पोशिंदा तर तिसऱ्या गट इयत्ता अकरावी बारावी साठी शिवशाही ते लोकशाही या हे विषय स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते. परीक्षक म्हणून सुकळी हायस्कूलचे उपशिक्षक शरद बोदडे पूर्णामायी विद्यालय घोडसगावचे उपशिक्षक जितेंद्र दुट्टे आणि मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती वैशाली राजपूत यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या शेवटी निकाल जाहीर करण्यात आला. व यातील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक दत्तात्रय फेगडे, उपशिक्षिका श्रीमती वैशाली सोनवणे ,उपशिक्षक राजेंद्र वाघ , विशाल काकडे , मंगेश दांडगे , संदीप पावरा , मयूर सपकाळे , लिपिक नवल कोळी , शिक्षकेतर कर्मचारी अनिल चौधरी , विजया सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक शरद चौधरी यांनी केले. तर आभार उपशिक्षक दत्तात्रय फेगडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button