मुक्ताईनगर येथे भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने संविधान विटंबनेचा निषेध, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

मुक्ताईनगर येथे भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने संविधान विटंबनेचा निषेध, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
मुक्ताईनगर (ता. जळगाव) येथे भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने परभणी येथे संविधानाची विटंबना करणाऱ्या नराधमांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. तहसीलदार साहेब व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या निवेदनाद्वारे संविधानाच्या अपमानास जबाबदार असणाऱ्यांना कडक शासन करण्याची विनंती करण्यात आली.
याप्रसंगी भारत मुक्ती मोर्चाचे खानदेश प्रभारी नितीन गाढे, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रमोद सौंदळे, राजू वानखेडे, सिद्धार्थ हेरोळे, अरुण जाधव, पारस हेरोळे, ब्रिजलाल इंगळे, निलेश वानखेडे, प्रमोद पोहेकर, मनोज पोहेकर, अफसर खान, हकीम चौधरी, इरफान बागवान, जाकीर जमदार, अॅड. कुणाल गवई, संध्याताई हेरोळे, सारीपुत्र गाढे आणि विविध समाजबांधव उपस्थित होते.
संविधानाच्या विटंबनेविरोधात उपस्थितांनी तीव्र संताप व्यक्त करत या घटनेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या आंदोलनाने घटनाक्रमाबाबत जनजागृती करण्यासाठी समाजात सकारात्मक संदेश दिला आहे.